श्री ट्रम्प राय - घाशीराम कोतवाल विडंबन

मूनांदी हे घाशीराम कोतवाल ह्या नाटकातीलः
श्री गणराय नर्तन करी
आम्ही पुण्याचे बामण करी ।ध्रु।
वाजे मृदंग
चढेची रंग
त्रिलोक दंग हो त्रिलोक दंग ।ध्रु।
देवी सरस्वती येतिया संग (२)
देवी शारदा येतिया संग (२)
श्री गणराय मंगल मूर्ती
तुझिया नामे पर्वत तरती
देवी सरसवती वादन करती
लक्शुमी तेथे वास करती
लक्श्मी शारदा ह्या दोघी सवती
गणेशापुढे हो जोडीनं लवती

गणेश देवा किर्पा हो ठेवा
आजच्या खेळाला यश द्या देवा
मंगल मूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया

आमचं त्यावरील विडंबन पुढील प्रमाणेः

श्री ट्रंप राय बडबड करी
अमेरिकेची लागली भारी ।ध्रु। 

बोले सवंग ट्वीटर तंग
घटनेचा भंग हो घटनेचा भंग

देवी हिलरीशी घेतोया पंगा
कधी सभेला होतोया दंगा

श्री ट्रंप राय बडबड करी
अमेरिकेची लागली भारी ।ध्रु।

भो ट्रंपराय लफडी हि किती
तुमचे वकीलही कुरकुर करती

संगनमताची वादळे फिरती
तुमचे विरोधी तरीही हरती (२)

श्री ट्रंप राय बडबड करी
अमेरिकेची लागली भारी ।ध्रु।

किम जोंग संग बात करती
शी जीन पिंगला नाव ठेवती (२)

टरंप भावा तिरपाहो कावा
मुलरच्या मागे डीओजे लावा (२)

गडबड्गुंडा करूया
मेक्सिको नि कोरिया (२)
ऐसी गाणी गाऊया
सगळ्या भिंती पाडुया (२)
.... ‌श्री ट्रम्पराय॥।