प्रतिभे

तुझी  आठवण म्हणजे 
शप्पय 
झुळझुळ वाहणारी हवाच आहे 
हवा दिसत नाही 
पण नसली तर श्वास गुदमरून जातो 
हे तुला माहीत आहे 
प्रतिभे 
तुझ्या आठवणी दिसतात 
भासतात 
त्या दिसल्या की मन फुलून जाते 
नि मनात तू सहज  रुजून जाते 
आठवणीवर नसतोच ज्याची आठवण काढतो त्याचा  अधिकार 
ज्याला आठवण आली ती  त्याचीच होऊन जाते 
प्रतिभे 
तुझी आठवण असली तरी ती माझी होऊन जाते 
तुझी आठवण हवेसारखी 
अधून मधून नाही आली तर 
जीव गुदमरून जातो ना प्रतिभे 
प्रकाश .