अजूनही तिचे शब्द माझ्या मनात बरसून जातात

आपले शब्द जेव्हा उमटतात कागदावर 
तेव्हा मन कसे भरून जाते 
नि आठवण कशी दाटून येते 
पूर्वी मीही लिहिले होते पत्र तिला 
आणि तिने सुद्धा लिहिले होते 
सतत घेऊन फिरलो होतो 
चोरून चोरून पुन्हा पुन्हा वाचीत होतो 
प्रत्येक वेळी शब्दातून नवे नवे अर्थ उमलत होते 
आजचे संदर्भ पुन्हा वाचतां नव्याने जाणवत होते 
हल्ली हल्ली   वॉट्सअपमुळे 
ती  कुणाचेतरी मेसेज मला फॉरवर्ड करीत असते 
कधी बरे वाटले तरी आपले वाटत नसतात 
पिझ्झा-बर्गर   दोन-तीन दिवस खायला मजा येत असते 
तरी दोन-चार दिवसांनी आईची भाकरीच आपल्याला हवी असते
पूर्वी मीही पत्र लिहायचो तिला  
ती माझे  पत्र चोरून वाचीत बसायची  
तिच्या   पत्रात  नेहमीच मला 
तब्येतीची काळजी घे 
थोडी योगासने थोडा व्यायाम करीत जा 
असा उपदेश करायची 
अजूनही तिचे   शब्द मनात रुतून आहेत 
अजूनही तिचे  शब्द  माझ्या मनात बरसून जातात 
हल्ली ती कुणाचेतरी मेसेज फॉरवर्ड करीत असते 
शप्पत आवडले तरी आपले वाटत नाही 
हे खरेच तिला का कळत नसते  ?
प्रकाश.