आम्हा नसते भान हो !
इकडे घाण तिकडे घाण चोहींकडे घाण हो ।
भारतीय आहो आम्ही आम्हा नसते भान हो ॥ व्हा सावधान२ध्रू॥
जाता येता रस्त्यावरती कचरा आम्ही फेकतो ।
पान , तंबाखू , गुटखा खाऊन रस्त्यावरती थुंकतो॥
थुंकी उडता दुसऱ्यावरती मानितो आम्ही शान हो॥ध्रू॥१॥
कचऱ्याचा हा ढीग पाहूनी जनता नाक मुरडते ।
कर्तव्याची जाणीव आपूल्या कोणालाही नसते॥
या कचऱ्याला सांगा तुम्ही जबाबदार कोण हो॥ध्रू॥२॥
स्वच्छतेसाठी शासन आपुले अनेक प्रयत्न करते।
कळत असून जनतेला ती, डोळेझाक करते॥
रोगराईने समाजात मग जातील आपुले प्राण हो॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.