जन्मास येणारी नाती.

माणसं भेटतात आणि नाती जन्माला येतात

रुसवेफुगवे सगळे नाकावरच ठेवून मिरवतात....
विचार कुविचारांची ओढ तान करतात...
खरं-खोटं सिद्ध करण्यात अख्ख आयुष्य वाया घालवतात....
प्रत्येक क्षणामध्ये हरण आणि जिंकण च घेऊन बसतात...
जिभेवरचे विषारी शब्दच जणू युद्धाची हत्यार बनवितात....
तू तुझं आणि मी माझं असला हट्टाहास जिवापाड जपतात....
अहो माणसं भेटली की नाती जन्माला घालावीत.....
एकमेकांना मनवीणयातच खरी ठसण दाखवावी....
कु विचारांना सुंदर कल्पने ची  कृती घडावी....
खरं असो किंवा खोटं ते आपलच मानावी....
स्वतःला हरवून दुसऱ्याला जिंकण्याची वृत्ती असावी.....
साखर ही विरघळेल असले शब्दच फक्त ओठी रेंगाळावी....
अहो तुझं माझं काय घेऊन बसलात 
नाती तर फक्त माणुसकीची जपावी....

श्वेता वासनिक