माझ्यात खोलवर इतकी रुजलीस का कळेना
जहर अंतरीचे शोषिलेस का कळेना
प्रेमात माझिया तू बुडलीस का
कळेना
स्वप्नातील रंग सारे उडले कधी कळेना
त्या रात्री आठवणींनी जागलीस का कळेना
नि:शब्द प्रणय याचना ती केलीस का कळेना
कैफात शब्द मिटता थांबलीस का कळेना
एकांत पूर्ण मिळताही सुकलीस का कळेना