तुझं माझं .....

तुझं माझं नातं

बाय बाय करण्यापुरतं
काळाच्या पटलावर
पडलेल्या ठिपक्यागत
आपलं आयुष्य
फुलणं,बहरणं,कोमेजणं,
अगदी आनंदीआनंदही
बेतासबात
पटलाला फरक
पडत नाही
पटलं तटस्थ,स्तब्ध
शांत,  त्रयस्थासारखं
पडलेला ठिपका
विरेपर्यंतच दु:ख
मधे मात्र सूखच सूख
सुखाचे क्षण 
असतातच
जमलं तर भेट
नाहीतर नांद
माझ्या जवळ
कायमचीच
फक्त बाय बाय
न करता