मोकळा

सांगून ही सारे कुठे मी मोकळा

तो व्यर्थ सारा सांगण्याचा सोहळा
मी वाढलो मी वाळलो वठलो भले
नव्हतो मुळातच पण कधी मी कोवळा
ते डोह आधीचे कुठे हा शोध घे
नंतर ठरव तू वाहण्याचे ओघळा
धरल्या उरी त्या भावनांनी काढला
नंतर पुढे माझ्या मनाचा कोथळा
जे झिंगले स्वर्गात त्यांना घेतले
नरकात भर्ती एकटा मी सोवळा
लेकीकडे जाईल म्हातारी कशी
लाखात भाडे मागतो तो भोपळा
.....
(जयन्ता५२)