प्रगतीचा मार्ग

उलटलेल्या आयुष्याचा

काळ आता संपला
पाहूया स्वप्ने उद्याची
पहाटेस दिसते सोनकळा
नव्या ऊर्मी,नवी क्षितिजे
धुंडताना जोर लावा
निराशेचे ढग निवारा
उत्साहाची वाट धरा
नका पाहू भूतकाळी
आता वर्तमान सजवा
कर्म मोठे हेचि जाणा
वास्तव आचरणात आणा
सुख संपत्ती भेटेल तेव्हा
बदल असे घडती जेव्हा
सांगणाऱ्या या कवीचे
उपकार नका मानू फुकाचे
अरुण ९००४८०८४८६