सहकारी गृहरचना संस्था मर्यादित

सध्या अनेक सोसायटी मध्ये अनेक प्रॉब्लेम्स पाहायला मिळत आहेतजसे की1) Maintenance न देणारे लोकं2) पाळीव प्राणी असल्याने उच्छाद आणणारे लोकं3) अस्वच्छता करणारे लोकं3) झाडे फुले ह्यावर भांडणारे लोकं4) पाणी पार्किंग व पार्सल वर भांडणारे लोकं5) सोसायटी communicate करत नाही म्हणून वैतागलेले लोकं6) शेजार्याना वैतागलेले लोकंतुमच्या सोसायटीत देखील असे नमुने आहेत का ? AGM 8 10 लोकांत उरकून स्वतःची पोळी भाजून मुख्य मुद्द्याला बगल देणारे लोकं तुम्ही पाहिलेत का?सोसायटी च्या नियमांची मेंबर म्हणून काही बदल सुचवता येतात का, नियम बदलता येतात का?सोसायटी जनहिताच्या कामात पैसा खर्च न करता वायफळ करत असेल तर मैनेटनन्स न भरल्याने नुकसान होऊ शकते का?सोसायटीच्या भोंगळ कारभाराबद्दल कुठे अपील करता येऊ शकते का? 4 लोकांनी सोसायटी हातात घेतल्यासारखे झाले असेल तर ते सुधारण्यासाठी शासनलेखी काही तजवीज आहे का?थोडी माहिती हवी आहे! मनोगतींपैकी जाणकार असतील तर .....