इश्कमे शहर होना

' इश्क में अजनबी न रहे तो इश्क नही होता'

रवीश कुमार, आजच्या वृत्तांकनाच्या काळात पत्रकार म्हणून त्यांचे वेगळेपण नजरेत भरते. पत्रकार म्हणून केवळ विविध बातम्यांच्या वाहिन्यावर फक्त त्यांनाच ऐकणाराही एक वर्ग आहे. (याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतील) बाकी, माणूस म्हणून तो उत्सुकतेचा विषय वाटला नाही तर नवल नाही.

अशा रवीश कुमारचं लघुकथांच्या साखळीत विणलेलं छोट्या छोट्या ओळीतलं प्रेयसी सोबतचा दिल्ली शहरातल्या भटकंती बरोबर समाज, सांस्कृतिक घटनांच्या स्पर्शात लिहिलेलं सुंदर पुस्तक म्हणजे 'इश्कमे शहर होना' कितीतरी वाक्य 'कोट' करावीत अशी आहेत.'जगह की तलाशमें हम इस शहरमें और कितने शहर बदलेंगे' 'इश्क में अजनबी, न रहे तो इश्क नही होता' ' जब कुछ नही भी बचेगा तो इस टिफिन बॉक्स में हम मोहब्बत की दो रोटिया रखा करेंगे'

चार-चार, तर कधी कधी दहा एक ओळीतलं सुंदर चित्रांसहित चितारलेले पुस्तक वाचनीय आहे. सलग दोन तास वाचायला बसले की पुस्तक संपते.

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचा, आपापल्या प्रेमाच्या आठवणींचा एक गोड कोपरा असतो. रवीश कुमारच्याही आयुष्यातल्या आपापल्या ठरलेल्या जागा आहेत. विशेषत: दिल्ली. लेडीज होस्टेल समोर उभे राहणे आहे, पाऊस, मंदिर, मशीद, गल्ली, रस्ते, रात्र, पहाट,चाँद, सार्वजनिक आंदोलने, टीव्ही, मीडिया, अण्णाचं आंदोलन, मार्क्स, लोकपाल ते लवपाल असा सुरेख प्रवास आहे.

काही काही वाक्य आणि कथा कोट करून लिहावीत अशी आहेत पण सर्वच सांगण्यापेक्षा पुस्तक एकदा वाचायलाच हवं...!