अशा बातम्या

वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात दिसतात. विशेषतः इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असला तरी त्या खूप जागा व्यापतात असे वाटते. तसेच, सामान्यांना एका मर्यादेपलीकडे अशा बातम्यांशी कर्तव्य नसते.
काय वाटते ?