पाथरवटाची बायको

थकले ग डोळे माझे
काम करतात हात
किती राबतात बिचारे
मिळण्या पोटासाठी घास.

घासासाठी लागले डोळे
घरच्या पिलांचे ग दिनरात.
सांगू कशी कुणाला मी
घरी जाताच झोंबतात

तोडलेले फत्तर.
बसती ग डोक्यावर
उन्हं डागण्या देती ग
पाय जळतात धुळी

धनी माजा तोडे
फत्तरांचे डोंगुर
पोट खपाटीला त्याचे
पाहता जीव गलबले