रखुमाईची तक्रार

रखुमाई तक्रार करी विठ्ठला 

असे कसे हो तुमचे भक्त 

नेहमीच गात असतात 

भजन आणि अभंग 

अन तुम्ही त्यांच्या 

अभंगतच दंग 

नाही तुमच्या जवळ माझ्यासाठी वेळ 

मग कसा चालायचा 

आपुल्या संसाराचा खेळ 

विठ्ठल उत्तराला 

चल माग उद्याच जाऊ वैकुंठला 

सोडुन या जगाला 

रखुमाई बोलली 

आत्ताच एव्हडी घाई कशाला 

बघुन जाऊ यांदाचा आषाढीचा सोहळा 

जिथे भरेल आपुल्या भक्तांचा मेळा 

येतील माझी लेकुरे पंढरपूर ला 

मग कसा पाय निघायचा माझा वैकुंठला