रुसलेली कळी

एक कळी खूप खूप रुसली 

हसायला तयारच नव्हती 

सूर्याने किरणे उधळली 

वाऱ्याने गीते गायली 

तरी कळी नाही हसली 

नाहीच हसली 

शेवटी भ्रमराने 

काळीच्या गालिचे चुंबन घेतले 

लाजून काळीच्या गाली हसू उमटले 

हळूच काळीचे फुल उमलले