चिकन रोस्ट

  • लशीयस किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन स्टोअर मध्ये किंवा नेहमीच्या चिकनवाल्याकडे मिळणारे बोनलेस चिकन ब्रेस्ट्स : ४०० ग्रॅम, ऑलिव्ह ऑइल, मिश्र बी (सूर्यफूल, तीळ वगैरेंचे मिश्र बी बाजारात हल्ली सहज मिळते), मिश्र हर्ब्ज, चिली फ्लेक्स, मीठ, मध, लिंबू, लाल तिखट
४ तास
दोन लोकांना एक वेळ

बोनलेस चिकन ब्रेस्ट्स चांगले धुवून घ्या. धारदार सुरीने त्यावर खोलवर चिरा द्या. त्यावर लिंबाचा रस, मिश्र बी, चिली फ्लेक्स, मिश्र हर्ब्ज, लाल तिखट, मीठ व आवडीनुसार मध घालून नीट मिसळून घ्या. मिश्रण चिकनच्या आतवर गेले पाहिजे. चिकन फ्रीजमध्ये तीन ते चार तास मुरवत ठेवा. करायच्या वेळी मायक्रोवेव्ह मध्ये‘ग्रील आणि मायक्रोवेव्ह’ या सेटिंगवर पाच मिनिटे ठेवा. नंतर बाहेर काढून बाजू बदलून पुन्हा पाच मिनिटे याच सेटिंगवर शिजवून घ्या.एका नॉन स्टिक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल चांगले गरम होईपर्यंत तापवा. त्यामध्ये हे चिकन ब्रेस्ट्स दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून / तळून घ्या. गरज वाटल्यास (चिकनच्या दर्जानुसार)पुन्हा पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवून घ्या. थोडे थंड होऊ द्या. मग आवडीनुसार पोळी, ब्रेड किंवा फ्राईड राईसबरोबर खायला घ्या.


मिश्र बी तळून चांगले खुसखुशीत होतात आणि त्यामुळे चिकनची खुमारी वाढते. मध थोडासा करपतो आणि त्यामुळे या पदार्थाला एक वेगळी लज्जत प्राप्त होते.   
स्वानुभव