एक पाऊल जेव्हा
सोडून देते धरतीचा आधार
आकाशात भरारी घेते
तेव्हा त्याला असतो विश्वास
दुसऱ्या पावलाच्या धरतीवर अढळ असण्यावर.
त्या विश्वासाच्या बळावर
मिळते त्याला ताकद
खुशाल धरती सोडून पुढे सरसावण्याची
आणि पुढच्या टप्यावर स्थिरावण्याची
आणि मग
डाव बदलतो
आणि तसाच विश्वास दुसरे पाऊल टाकते
पहिल्यावर ...
आता स्वतः धरती सोडून भरारी घेताना..
ते भरारी घेणंही वाटून घेतात...
आणि आधार होणंही..
अगदी असेच राहू आपण दोघे
एकमेकांना आधार
आणि भरारी घेण्याची संधी होऊन
नक्की..
तुष्की नागपुरी
नागपूर, १२ नोव्हेंबर २०१४, ०७:३०