गावठी कोंबडीचे तुकडे धुऊन त्याला मीठ, हळद, लिंबूरस आणि आले-लसूण पेस्टचे दोन सॅशे चोळून एक तास मुरवत ठेवावे.
मग कुकरमध्ये कोंबडी पाऊण शिजवून घ्यावी. एक शिटी आणी ज्योत बारीक करून पाच मिनिटे एवढे गावठी कोंबडीला पुरे.
कांदा पातळ कापून घ्यावा. मिरच्यांना उभा छेद द्यावा.
पॅनमध्ये तेल मध्यम ज्योतीवर गरम करावे. तेल धुरावल्यावर त्यात मिरच्या घालून ज्योत बारीक करावी. दोन-तीन मिनिटे (मिरच्या खरपूस तळल्या जाईस्तोवर) झाल्यावर ज्योत मध्यम करून पातळ चिरलेला कांदा घालावा. कांद्यापुरेसे मीठ घालून कांदा गुलाबी होईस्तोवर परतावे.
कांदा गुलाबी झाल्यावर आले-लसूण पेस्टचा एक सॅशे घालावा. अर्धी जुडी बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. परतत रहावे.
आले-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर एकजीव झाल्यावर कुकरमधील पाऊण शिजलेली कोंबडी घालून परतावे.
मिश्रण चटचटू लागल्यावर उरलेली अर्धी जुडी कोथिंबीर बारीक चिरून घालावी. सर्व नीट मिसळल्यावर ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. झाकणाला वाफ धरल्यावर झाकण काढून परतावे. पाच मिनिटांनी ज्योत बंद करावी.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.