चिकन तंदुरी बटर फ्राय

  • १ पूर्ण तंदुरी चिकन (खाण्यास तयार)
  • मोठे कांदे ४, कांद्यांपुरेसे मीठ
  • तेल ३० मिली
  • अमूल बटर ५० ग्रॅम
३० मिनिटे
दोन-तीन जणांसाठी

चिकन तंदुरी बटर फ्राय

सुरीने तंदुरी चिकनचे मांस हाडांपासून पूर्ण मोकळे करून घ्यावे. त्या मांसाचे तुकडे होतील तसेच राहू द्यावेत, अजून कापू नये.

चार कांदे उभट कापून घ्यावेत.

पॅनमध्ये तेल घालून मंद आचेवर दोन-तीन मिनिटे तापवावे. मग त्यात अमूल बटर घालावे आणि धुरावेपर्यंत मध्यम ज्योतीवर तापवावे. धुरावल्यावर लगेच ज्योत बारीक करून कांदा घालावा नि परतावे. कांद्यापुरेसे मीठ घालावे.

सुमारे दहा मिनिटांनी (कांद्याचा रंग पालटून गडद होऊ लागला की) तंदुरी चिकनचे बोनलेस तुकडे घालावेत आणि मध्यम आचेवर पाच-सहा मिनिटे परतत रहावे.

मग ज्योत बंद करावी.

(१) टोस्टवर हे मिश्रण घालून आवडीप्रमाणे मेयो/चीज घालून चिकन ऑन टोस्ट करता येईल.

(२) उरलेली हाडे अर्धा लिटर पाण्यात अर्धा तास मंद आचेवर उकळवावी. चिकन स्टॉक तयार होईल. उरलेली हाडे कुत्री-मांजरे-कावळे आनंदाने खातील. प्राणी-पक्ष्यांना मीठ-मसाल्याचे आपरूक नसते. कावळा तर तंदुरीचे हाड पाण्यात बुचकळून धुऊन घेऊन खातो.