हक्क
पाठीवरचा हात पाहुनी थक्क आहे तेव्हापासुन
तुझा माझ्या आयुष्यावर हक्क आहे तेव्हापासुन
चुकल्यावर मी वाट दाखवे नजर तुझी रोखुन धरलेली
देवदूत तू मनात माझ्या पक्क आहे तेव्हापासुन
विचारता तू फक्त एकदा काय सोबती घेऊन जाशील
मी पण माझे विरून गेले चक्क आहे तेव्हापासुन
सुख करते फ्लर्टिंग तात्पुरते वेदना कमीटेड कळले
नातं वेदनेशी माझं सक्ख आहे तेव्हापासुन
उद्ध्वस्त झालो पडलो तरीही श्वास थांबले सोबत माझ्या
प्रतिभेची कट्यार तळपते लक्ख आहे तेव्हापासुन
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, १९ फेब्रुवारी २०२६