रखुमाई गेली विठ्ठला सोडून

रखुमाई विचारी विठ्ठला

सांगा तुम्हा सर्वात प्रिय कोण

मी की हे भक्त गण

विठ्ठल उत्तरला

मला एकसमान दिसती सारे जण

माता आणि पुत्रामध्ये

प्रिय अप्रिय ठरवेल कोण

म्हणून रखुमा रुसून

रखुमाई गेली विठ्ठला सोडून