संध्या म्हणे प्रभाला रविकर माझा माझा माझा
रोज तुला सोडून येई मज भेटायला
प्रभा म्हणे नाही नाही रविकर माझा माझा माझा
मला चुंबल्याशिवाय न तो दिवसाची सुरुवात करे
ना निघे जगात फिरायला
सर्व जग फिरून येई शेवटी तुला भेटायला
म्हणून रविकर माझा माझा माझा
दुपार भांडणात पडली समजावू लागली
नाही रविकर तुम्हा दोघांचा
एकीला सोडून जाई
एकीला जाई शेवटी भेटायला
दिवसभर रविकर असे माझ्याच घरा म्हणून
रविकर माझा माझा