कोल्होबांची शाळा

एक होता ससा
शाळेत जाऊन हसला

कोल्होबा होते मास्तर
त्यांनी मारला डस्टर

ससोबाने मारली उडी
गुटख्याची पडली पुडी

कोल्होबा फारच रागावले
छडी घेऊन मागे लागले

"गुटखा खातोस
तंबाखू खातोस ?
आईवडलांना घेऊन ये
पेनल्टीचे पैसे घेऊन ये"

"शाळेतून नावं काढून टाकीन
परीक्षेत नापास करीन
खालच्या वर्गात बसवून ठेवीन
वर्गाबाहेर उभा करिन"

ससा मग घाबरला
आईवडील मारतील म्हणाला

शिक्षा थोडी कमी करा
पेनल्टी लावू नका
पुन्हा असं करणार नाही
गुटखा तंबाखू आणून देईन

मास्टर मग हळूच हसले
गुटखा खात खुर्चीवर बसले

"पुन्हा गुटखा घेऊन ये
माझ्या तोंडात कोंबून दे
पिंक टाकायला थुकदाणी दे
सगळं नीट समजून घे."

ससोबाची मान खाली गेली
आई चुपचाप घेऊन गेली

अरुण कोर्डे©®