मालवणी मसाला.

  • काळी मिरी ५ ग्रॅम ( १ टेबलस्पून सपाट)
  • लवंगा १० ग्रॅम ( २ टेबलस्पून सपाट)
  • बडीशोप ६० ग्रॅम (८ ते ९ टेबलस्पून शीग लावून)
  • जीरे १० ग्रॅम (२ टेबलस्पून शीग लावून)
  • हिरवी वेलची ५ ग्रॅम ( २५ नग)
  • अख्खे धणे ९० ग्रॅम (१८ ते २० टेबलस्पून)
  • दालचीनी २० ग्रॅम (३० ते ३५ इंच)*
३० मिनिटे
मालवणी चिकन, मटणसाठी.

वरील मसाल्याचे सर्व जिन्नस एकत्र करून, मंद आंचेवर, कोरडे भाजून घ्यावे. मसाले नीट भाजले गेले की खाली उतरवून थंड होऊ द्यावे. (एखाद्या ताटात, पसरवून, काढावेत.)
थंड झाले की मिक्सरच्या ड्राय ग्राइंडर मध्ये घालून त्याची वस्त्रगाळ पूड बनवावी. ही पूड पुन्हा ताटात पसरवून ठेवावी. थंड झाली की हवाबंद बाटलीत भरून 'मालवणी मसाला' असे त्यावर लिहून ठेवावे. वरील प्रमाणात साधारणपणे २०० ग्रॅम मसाला तयार होतो.

*दालचिनी नळकांडीच्या स्वरूपात मिळते. तिचे उभे चार भाग केले की पन्हाळ्याच्या आकाराचे ४ तुकडे होतात. अशा आकाराची दालचिनी ३० ते ३५ इंच घ्यावी. अख्खी नळकांडी असेल तर ९ इंच पुरेल.

नाहीत.

अंतःस्फूर्ती..