अभ्यासाचा फराळ !

जगदीश खेबुडकरांनी जणू काही 'अभ्यास नको'चे भारूड लाच उत्तर दिलंय या कवितेतून !

पहाटेची आंघोळ, नवे नवे कपडे
सोन्याची झाली सकाळ रे
चला अभ्यासाचा करूया फराळ रे !
मराठी भाषा, चिरोटा-करंजी
इंग्रजी बर्फी, खाऊया ताजी
संस्कृत मऊ खीर मवाळ रे !
इतिहास चिवडा मस्सालेदार
भूगोल लाडू चट्टकदार
नागरिकशास्त्र, जामून रसाळ रे !
गणिताची चकली काटेरी
भूमितीची शेव भारी टोकेरी
गायनाचा हलवा दूधाळ रे !
कॅडबरी चॉकलेट पीटीचे
खाताना गंमत जमतीचे
सारेजण करूया धमाल रे !

- जगदीश खेबुडकर, कोल्हापुर.