एका इ-पत्रामधून फिरत फिरत आलेले माधुरी बाई दीक्षित-नेनेंनी घेतलेले उखाणे खालती देत आहे
१.) केळीचे पान कसे चुरू चुरू फाटत
नेनेंचे नाव घ्यायला कस कसच वाटत
२.) भरल्या पंक्तीत उद्दबत्तीचा वास
नेनेंना भरवते कारल्याचा घास
३.) संपात संप कामगारांचा संप
नेनेंच्या हातात ढेकणांचा पंप
४.) लेण्यात लेणे सौभाग्याचे लेणे
मिश्टर माझे नेने बाकी काय देणे घेणे
५.) गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास
नेने आता बनले माझ्या आयुष्याचा त्रास
६.) सुंदर सुंदर हरिणांचे वाकडे तिकडे पाय
नेने अजून आले नाहीत खड्ड्यात पडले की काय
७.) तेलाच्या दिव्याला तुपाची वात
नेनेंशी केले लग्न.. आता आयुष्याची वाट
८.) पिक्चर मध्ये पिक्चर माझं नाव त्याचे पुकार
नेने आहेत मात्र भलतेच टुकार
९.) आशिक आहेत माझे सगळ्या जगात
पण नेनेच फक्त भरले माझ्या मनात.
१०.) भल्या पहाटे कोंबड्याने दिली बांग
नेनेच माझे मिश्टर अख्ख्या जगाला सांग
११.) कामात काम सरकारी नेनेच माझे कारभारी.
मनोगतींनो ह्यातून केवळ विनोद निर्मितीचा प्रयत्न केला गेला आहे तेंव्हा हलकेच घ्या. ह्यातील बरेचसे लोकांच्या वाचनात आधी आले सुधा असतील..!!
धन्यवाद
गार्गी.