पालक धुवून चिरून घ्यावा. पातेल्यात पाणी न घालता पाचकपात्रात मऊ शिजवून घ्यावा. शिजलेला पालक गार झाल्यावर त्यात दही आणि चवीला मीठ घालवे आणि चमच्याने सारखे करून घ्यावे. त्यावर थोड्या तेलाची (तुपाची आवडत असली तर तुपाची) फोडणी करून घालावी. फोडणीत लाल मिरच्या आणि मेथी घातल्याने चव आणि स्वाद छान येतो.
आहार नियंत्रणावर जेवण असलेल्यांना हाच जेवणाचा मुख्य पदार्थ म्हणून खाता येईल. बाकिच्याना कोशिंबीर/भाजी या स्वरूपात पोळी किंवा भाताबरोबर खाता येईल.
आपले मत जरूर कळवा.
कलोअ, सुभाष
इथे बाजारात गोठवलेला आणि चिरलेला पालक नेहमी मिळतो तो वापरल्यास फारच लवकर तयार होणारा पदार्थ आहे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.