एक सोडून..... सगळ्या माझ्या... भाग-२

 एक सोडून..... सगळ्या माझ्या... भाग-१

तिने ते पत्र वाचण्यास घेतले... अन...... थोड्याच वेळाने....


ती- " Wait !"


मी-"हा... काय झालं ?"


पुढे.....


ती-"काही नाही." तोच सगळा वर्ग आत आला... व इतिहासाचा तास सुरू झाला.... देसाई बाईंचा मी आवडता विध्यार्थी ! कारण इतिहास माझा आवडता विषय... १०० पैकी ९० मार्क पक्के. ... देसाई बाई म्हंजे एक गोल-भरगच्च व्यक्ती महत्त्व. मला हि खूप आवडायच्या... तर तास सुरू झाला... पण रुपाली चा Wait हा माझ्या कानांमध्ये घुमत होता... काहीच कळायला मार्ग नव्हता की तिच्या मना मध्ये काय चाले ले आहे ते..


तासा मागून तास संपले.... दिवस संपत आला... शाळा सुटल्या वर मी पळतच खाली गेलो तर... पाहिले की सीमा व ती एकत्र बोलत उभ्या होत्या.... मला पाहताच त्या दोघी निघून गेल्या.... माझा जीव इवल्याश्या चिमणी एवढा झाला.... सारी रात्र जागून काढली...


अरे ! सकाळी उठण्यास वेळ झाला आज.... पळतच आवरा-आवर करून शाळेत पोहचलो.... पण सारा वर्ग भरला होता पण ती नाही दिसली.... माझे मन अनेक शंका-निःशंक ने भरून निघत होते... काहीच कळेना... सीमा ची नजर ... बापरे ही ला काय झालं एकदम.. ही अशी का बघते आहे माझ्याकडे जसे काही... मी काहीसा तीच्या साठी तुच्छ प्राणी आहे....


तोच ती आली.... पण ती च्या चेहऱ्यावर हे विजयी हास्य का ?....


थोड्याच वेळाने देसाई बाईचा तास सुरू झाला.... वर्गामध्ये येताच... बोलल्या .... " ह्हम... तर मग आपल्या शाळेतून आता प्रेमवीर देखील बाहेर पडणार तर...."


झालं...... माझ्या डोळ्यांसमोर एकदम अंधकार ! डोके गरगरले एकदा तर... ह्या बये न माझे प्रेम-पत्र देसाई बाईंना तर नाही दिल ना ?


माझा अंदाज कधी नव्हे तो खरा ठरला.... देसाई बाईंनी मला उभे केले... व माझेच प्रेम-पत्र मला व माझ्या सगळ्या वर्ग मित्रांना एकदम खड्या आवाजामध्ये ऐकवले.... प्रेम पत्र मी येथे देत नाही आहे कारण लांबी हा विषय पुन्हा एकदा मनोगतावर चर्चेला येऊ नये असे मला वाटते..(ह̱.ह्या.)


दे.बा. - " अहो प्रेमवीर, कधी मराठीच्या तासाला बसला आहेस का नाही... पत्रामध्ये १०० चुका."


मी.-"sad"


दे.बा.- " ह्या तुझ्या प्रेम-पत्राचे प्रताप तुमच्या आई-वडिलांच्या कानावर घालाच हवेत."


मी- "nailbiting"


दे.बा.- " चल बोल... आपल्या वर्गामध्ये किती मुली आहेत?"


मी- " १७ "


दे.बा.-" माझ्या पाठोपाठ बोल.... ह्या वर्गातील सर्व मुली मला बहीणी सारख्या आहेत..."


मी- " ह्या वर्गातील सर्व......" हे काय  ? काहीतरीच.... माझा पुरुषी स्वभाव एकदमच जागृत झाला... व मी उद्गार लो... " ह्या वर्गातील १ सोडून सर्व मुली मला बहीणी समान आहेत..."


सगळा वर्ग आ वसून माझ्या कडे पाहू लागला.... तोच एकदम कडकडाट झाला... पण तो कडकडाट टाळ्यांचा नव्हता तो होता देसाई बाईचा माझ्या गालावर..... 


दुसऱ्या क्षणी मी प्राध्यापकांच्या रूम मध्ये... ते व माझे तात (वडील) मित्र हे मला तेथेच सर्व प्रथम कळले... थोड्या वेळाने माझे वडील आले... व तेथून घरा पर्यंत माझी वरात हि निघाली...  दे दणादण !


तीन दिवस घरी... १५ दिवस मामा कडे....


२५ दिवसांनी प्रथमच शाळेमध्ये पाय ठेवला.... वर्गात जाताच  क्षणी सगळा वर्ग जोरात ओरडला.... "एक सोडून .... बाकी सगळ्या.."


मी हळूच तीच्या कडे पाहिलं तर ती खुद्द करून हसली......


आज त्या मुलीचे लग्न झाले आहे.. दोन मुले हि आहेत... थाबा... माझ्या शी नाही हो झाले... माझी पहिली प्रेम कहाणी तर अपूर्णच राहिली....


 


आपला


राज.


ता.क. - ही सत्य घटना आहे.... व सर्वश्री माझ्या जीवनातील एक  अविभाज्य अंग बनून राहिली आहे...