आंबेडाळ

  • हरबरा डाळ १ वाटी
  • मिरच्या २-३
  • कोथिंबीर, ओला नारळ मिळून अर्धी वाटी
  • तेल, मोहरी, हिंग, हळद
  • आंबट मध्यम आकाराची कैरी अर्धी
  • मीठ, साखर
१५ मिनिटे
२ जणांना

हरबरा डाळ ७-८ तास भिजत घालणे. डाळीतले सर्व पाणी काढून टाकणे. नंतर डाळ भरड वाटणे. डाळ वाटतानाच त्यात २-३ मिरच्या घालाव्यात, म्हणजे तिखटपणा सर्व डाळीला सारखा मिसळला जाईल. नंतर त्यात अर्धी कैरी किसून घालणे. चवीप्रमाणे कैरीचे प्रमाण कमी-जास्त करण्यास हरकत नाही. नंतर वरून फोडणी घालणे. चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर, व चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ  घालून हे सर्व मिश्रण चमच्याने एकसारखे करणे. झाली आंबेडाळ तयार.

रोहिणी

नाहीत.

सौ आई