मुळामिरची

  • २ ताजे मुळे
  • १०-१२ हिरव्या मिरच्या
  • चवीप्रमाणे मीठ, साखर
  • १ लिंबाचा रस
  • फ़ोडणीचे साहित्य
१५ मिनिटे
४ जणांना
  • मुळे किसून घ्यावेत.
  • मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत.
  • तेल तापले की मोहरी, जिरे, हळद आणि मिरच्यांचे तुकडे घालावेत.
  • मुळ्याचा कीस त्यावर परतावा.
  • पाण्याचे झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफ़ा येऊ द्याव्या.
  • आता कीस शिजेल मग मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला.
  • झटपट मुळामिरची तयार!

तिखट आणि आंबट चवीची (.....ट्टॉक) मुळामिरची भाजी/कोशिंबीर दोन्हीचे काम करते.

सौ. आई