मन सुन्न करणारी कविता!
विदर्भ साहित्य संघ, नागपूर ह्यांच्यातर्फे प्रकाशित होत असलेल्या 'युगवाणी' ह्या अनियतकालिकात, अनेक अनेक वर्षांपूर्वी एक कविता प्रकाशित झाली होती, फक्त चार ओळींची पण मेंदूला झिणझिण्या आणणारी! कविचे नाव मला आता आठवत नाही,पण कविता आठवली की मन सुन्न होऊन जाते.
शीर्षकासहीत ती कविता खाली देतो आहे.
'बलात्कार'
हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई;
सगळे ओरडले-"आम्ही भाई-भाई"!
मग बहिणी कोण?
-सगळेच मौन!
-मानस६