फुटकळ

फुटकळ


माझ्या 'सेनेच्या' भूमीत
गड्या आसन सिंहाचे
भर चौकात चालले
सण उत्सव पिण्याचे

माझ्या 'गोमट्या' भूमीत
लठठ गाद्या लठ्ठ उश्या
बोके माजले सगळे
झाल्या पिळदार मिश्या

माझ्या 'कानडी' भूमीत
गेले वाटपाचे पाणी
लाथा मारूनही गाऊ
आम्ही गोड गोड गाणी

माझ्या 'सिलिकॉन व्हॅलीत'
सुखी मराठी मंडळे
दुःख त्यांचेच कोवळे!
त्याचे देखणे सोहळे!


फुटकळ ही कविता
झाली वाचून क्षणात 
मी घरात माझिया
तुम्ही तुमच्या घरात


-अ