तंदूरी बटाटे

  • ८ मध्यम आकार बटाटे
  • कॉर्न्फ्लोअर ३ चमचे
  • गरम मसाला व चाट मसाला,मीठ, तिखट इ.
  • खवलेले ओले खोबरे १ नारळाचे
  • कोथिंबीर
  • बेसन १ चमचा
  • आवडत असल्यास फरसबीच्या शेंगा बारीक चिरुन
  • आवडत असल्यास दाण्याचा कूट
३० मिनिटे
४ जण

बटाटेः
१. बटाटे उकडून घ्यावेत.
२. सोलून निम्मे कापावेत.
३. धारदार चमच्याने बटाट्याचा आतला भाग पोखरावा शक्यतो बटाटा मोडू न देता.

आतले सारणः
१. बटाट्यांचा पोखरुन काढलेला आतला भाग,मसाले,चिरलेली कोथिंबीर, खोबरे,दाण्याचा कूट,तिखट मीठ,वाफवलेल्या बारीक चिरलेल्या फरसबीच्या शेंगा हे सर्व एकत्र करुन थोडे मळावे.
२. हे सारण आपण पोखरुन तयार केलेल्या बटाट्यांच्या वाट्यांत दाबून भरावे.
३. कॉर्नफ्लोअरची पाण्याबरोबर मीठ आणि मसाला टाकून लापशी (पेस्ट)तयार करावी.(त्यात काहीतरी घोळवता येईल इतपत पातळ).
४. त्यात बटाटे घोळवून तव्यावर तेलात मध्यम आचेवर तांबूस रंगावर परतावे. अधून मधून उलटावे म्हणजे घोळवलेले वरचे पीठही परतले जाईल.
५. चाट मसाला वर शिंपडून गरम वाढावे.

 

 

'सॉस भी कभी टॉमेटो था' बरोबर चांगले लागते.
सारणातील पदार्थ आवडीनुसार बदलता वा कमी जास्त करता येतील. फक्त बटाटा पोखरण्याची मेहनत करुन परत बटाट्यात फक्त नुसता बटाटा भरु नका म्हणजे झालं!

साहिल हॉटेलमधले तंदूरी आलू,ते काय काय घालतात माहिती नाही, मी वर लिहीलेले पदार्थ घालते.