पावसाळा
आला आला म्हणताना
निघून गेला पावसाळा...!
भेट त्या दिसाची
सांगून गेला पावसाळा...!!
जरासाही भरला नाही
रिता कोपरा मनाचा...
नुसताच शिडकावा
घालून गेला पावसाळा...!!
कोणते कारण आहे..
टाळणारे पावसाळा..?
आठवणीत मजला
जाळून गेला पावसाळा...!!
कुणास लाभला दिलासा
अशा या पावसाने..
आसवांच्या मुंडावळ्या मज
बांधून गेला पावसाळा...!!
जखमेवरच्या खपल्या
काढून गेला पावसाळा...
दुश्मनासारखा माझ्याशी
वागून गेला पावसाळा...!!
पाहिलेत आजवरी मी
कित्त्येक पावसाळे..
प्राण माझे माझ्याशी हा
मागून गेला पावसाळा...!!
अरुणकुमार