एक विचार

नमस्कार मडंळी, माझं मराठीच व्याकरण तसं आधिपासूनच कच्चं आहे, त्यामुळे चुका होतीलच, आणि हेच गृहीत धरून मी आधिच तुमची माफ़ी मागतो आणि माझे हे विचार तुमच्यापुढे माडंतो. चुका सुधारण्या साठि तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.


 


"एक विचार"


मला कळ्तयं की तुझं माझ्यावर प्रेम नाही.


तरीही  माझ्या ह्र्दयापूढे मी लाचार आहे.


रोज विचार करतो कि 'आता विसरायच तुला'


आणि रोज विसरतो तो 'हाच' विचार आहे.


 


"आणखी एक विचार"


काल तुझी 'जाळीदार ओढ्णी' पाहून एक विचार माझ्या मनी आला,


कि मागुनही देवाकडे मी का बरं मिळालो नाही तुला.


देव नक्कीच निष्ठूर नव्हते तर चूक तुझीच असावी,


कदाचित 'ह्याच ओढ्णीचा' पदर पसरला असशिल तू मागताना मला.