मज नयन वदती तुज काही
ओठ परी का झुगारती
दु:ख हे जीव घेणे भारी
हृदयी मज सदा वासकरी.
परी तू विश्वासला ओठांवरी
नयनातील सारे भाव विसरशी
मज जगाचे पाश बांधती
उमगले नाही तुज परी कधी
म्हणशील गेली निघोनी भुलवुनी
काय मिळे मज तुला दुखवुनी
माझी वेदना माझीया अंतरी
मुकले प्रेमा आणि सारे काही
अधुरीच आपुली प्रीत कहाणी
मनी यातना डोळा पाणी.