शेंगदाण्याचे रायते

  • 1 वाटी रात्रभर भिजवलेले शेंगदाणे
  • 2 वाट्या दही
  • 2 मिरच्या
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा तूप
  • चवीपुरते मिठ साखर
१५ मिनिटे

रात्र भर भिजवलेले शेंगदाणे एक शिटी होई पर्यंत कुकर मध्ये उकडून घ्या. त्यातील पाणी काढून टाका. अर्धा चमचा तूप कढईत घालून त्यात मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्या कुरकुरीत होत आल्या की जिरे घाला आणि त्यावर उकडलेले शेंगदाणे घालून परता. चांगले परतले गेल्यावर गॅस बंद करा. दह्यात मिठ साखर घालून मथून घ्या. हे मथलेले दही परतलेल्या दाण्यांवर घालून मिळवून घ्या. हे रायते त्वरीत देखील खाता येईल किंवा अर्धातास फ्रिज मध्ये गार करुन ही खाता येईल. उपासासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. अवश्य करुन पहा आणि प्रति‍क्रीया पाठवा. 

सजावटीसाठी कोथिंबीर घालून वाढल्यास आणखी छान लागेल!

दोंदे काकी