चुटपुटे

  • चैत्रातल्या हळदी-कुंकवाला मिळतात ते चणे
  • फोडणीचे साहित्य
  • तिखट, चवीपुरतं मीठ
१५ मिनिटे
कितीही केले तरी कमीच पडतात

चणे स्वच्छ धुवून घ्यावेत. कढईत थोडं जास्त तेल घेऊन फोडणी करावी(तिखट न घालता) आणि त्यात चणे टाकावेत. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणावी. नंतर चण्यांवर तिखट घालून परतावे. चुटपुट असा आवाज आल्यावर गॅस बंद करावा.

 

ह्यावर लिंबू पिळले तरी चालते किंवा ओलं खोबरं घालून सुद्धा छान लागतात.

आई