पनीर कटलेट्‍स

  • 250 ग्रॅम्स पनीर, 50 ग्रॅम्स चीझ, 4 ब्रेड स्लाइस, 4 चमचे ओले खोबरे
  • आले जरासे , 3ते 4 मिरच्या , अर्धाचमचा जिरेपूड , मिठ चवीनुसार,
  • मनसोक्त कोथिंबीर आणि पुदिना, तळणीसाठी तेल
१५ मिनिटे
२ जणांसाठी

ओलेखोबरे, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या आले वाटून घ्या, पनीर कुस्करुन घ्या, चीझ किसून घ्या, सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र झाले की त्यात जीरेपूड व मिठ घाला, ब्रेडच्या स्लाईस पाण्यातून काढून घट्‍ट पिळा. त्याही या मिश्रणात मिसळा. चपटे कटलेट्‍स करुन उथळ भांड्‍यात सोनेरी रंगावर तळा

खजूराची चटणी किंवा सॉस बरोबर गरमागरम खा.

सासूबाई