मदिरेस मी म्हणालो
दे नशा जराशी
होउन धीट थोडा
बोलेन मी स्वतःशी
मदिरा म्हणाली तेव्हा
लढतोस का मनाशी
जमवुन धीर थोडा
जा भांड जा जगाशी
मदिरेस मी म्हणालो
आधार दे जरासा
फ़ेसाळत्या सुखाचा
दे गारवा जरासा
मदिरा म्हणाली तेव्हा
राहीन मी उशाशी
तुझी असेन जेव्हा
तुटशिल तु जगाशी
मदिरेस मी म्हणालो
भाळेन ग तुझ्यावर
होतील लाख चुका अन
येईल आळ तुझ्यावर
मदिरा म्हणाली तेव्हा
मी सवत रे सुखाची
आजन्म भोगते मी
दुःखे अनाथ, परक्यांची
(मदिरासक्त)मन्नु