काहूर

स्वतःच्याच घराकडे जाणारया वाटा


सध्या अधिकच धुसर होतात..


रात्रीची वाट ही न बघता सन्धीकालीच


 आठवणी काहूर माजवतात..


माहीती आहे मला नका येऊ म्हणालो


 तरी त्या ऐकणार आहेत थोड्याच..


अरे सांगा त्यांना समजाऊन कुणीतरी


निदान रात्र व्हायची तरी वाट पहाच...