डायरी --- 'तिची' आणि 'त्याची'

मित्रांनो, असं म्हणतात की दुसऱ्याची डायरी कधी वाचु नये. पण ई-मेल मधुन मला 'त्या' दोघांच्या डायरीमधलं एक पान कुणीतरी पाठवलं आणि ते तुम्हालाही वाचुन दाखवण्याचा मोह मला आवरला नाही. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जीवनातही हे पान कधीतरी फडफडलं असेल ना!


तिची डायरी


गेला आठवडा झालं बघतीय.. याला नक्की झालय तरी काय? माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये तो. जेवताना सुद्धा मुकट्याने जेवतो. तिखट जास्त झालय, मीठ कमी आहे, असले नखरे बंद झालेत. किती जाड झालीयेस म्हणून हिणवत पण नाहीये. का.. का असं दुर्लक्ष करतोय तो माझ्याकडे?
शेवटी आज बाहेरुन आल्यावर मी विचारलं," बाबा रे काय बिनसलय तुझं? बोलत का नाहीयेस माझ्याशी नीट?" तर नुसत हसुन म्हणाला," छे गं, कुठं काय?"
आत येऊन किती प्रेमानं त्याच्या गालावर ओठ टेकवुन त्याला 'आय लव्ह यु' म्हणाले, तरीही काही प्रतिक्रिया नाही. परत मला साधं ' आय लव्ह यु टू' सुद्धा म्हणाला नाही.
त्याच्या आयुष्यात कुणी दुसरी तर...........


 


त्याची डायरी


.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.


 


छे.. भारतानं विंडीज विरुद्धची  सीरीज गमावली!!!!!!!!!