बोलणारी झाडे

बोलणारी झाड हलणारी झाड
खूप खूप मजेत गाणारी झाड

झाडावरच पान गळल पहा
गळताना त्याला लागल पहा
म्हणाल आयुष्य संपल पहा-1

झाडावरच फ़ूल फ़ूलल पहा
फ़ूलतांना खुद्कन हसल पहा
म्हणाल सगळे मजेत रहा-2

झाडावरच फ़ळ पिकल पहा
पिकतांना ते लाजल पहा
म्हणाल सगळे मधूर व्हा-3