शक्ती

असे म्हणतात की कोणे एके काळी मानवाकडे दैवी शक्ती होत्या...


मानवाने त्यांचा दुरूपयोग केला.


सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवांना राग आला.


मानवाकडून त्या शक्ती हिरावून घेऊन कुठेतरी लपवायचं त्यांनी ठरवलं.


देवांची सभा भरली.


कुणी म्हटल, "आपण त्या शक्ती पाताळात गाडल्या म्हणजे कोणालहि कळणार नाही.


ब्र्म्हदेव म्हणाले,'उत्सुकेपोटी हा प्राणी पाताळात जाईल'...


'समुद्रात आपण ह्या शक्ती बुडवल्या तर?' काही देवांच्या मनात आले.


'नाहि .. हा चौकस प्राणी कधी ना कधी सागरतळ गाठेलच आणि आकाशाबद्द्ल म्हणाल तर त्याल ती ओढ पहिल्यापासुनच आहे'.


ब्रम्हदेवांच्या ह्या उद्गगाराने देव निराश झाले.


ब्रम्हदेव विचारात पड्ले 'ह्या शक्ती आपण मानवातच दडवून ठेवल्या तर?


मला वाटतं स्वतःमध्ये डोकावून पाहण्याचा विचारही त्याच्या डोक्यात येणार नाही आणि आला तरी तो कंटाळा करील'.


हा विचार सर्वाना पटला.ब्रम्हदेवांनी तो अंमलात आणला...


त्यानंतर मानवाने पृथ्वी पालथी घातली...


समुद्रतळ गाठला...


विश्वाचे रहस्य उकलण्यासाठी डोकेफोड करू लागला...


पण स्वतःला मात्र शोधू शकला नाही...