मीही एक मृगजळ..
मृगजळाच्या प्रदेशातून परत येतांना
अंगभर हसू मिरवत आणतो मी तुझं…
आणि आश्चर्य वाटत राहतं
माझ्या कल्पनांना चैतन्य देणाऱ्या
या मृगजळाचं...
माझ्या हाकेला तुझी उत्तरं
मीच दिली आहेत तिथे...
आणि तुला आश्चर्य वाटेल
इतकी ती तुझीच आहेत...
लखकन चमकलेली वीज
कुठे संपते आणि कुठे पाण्यात शिरते
नाहीच कळत..
तशीच तू आणि तुझे भास,
आणि मग मीही एक मृगजळ…
गिरीराज