सहा-सहा-सहा

मंडळी,
उद्याची तारीख बघितलीत का?
सहा जून २००६, संक्षिप्त लिहिली तर ६-६-६ होते.

तर या कट्ट्यावर सहा या संख्येची महती सांगणारी माहिती, वाक्प्रचार, म्हणी, कविता, श्लोक, सुविचार, घटना, किंवा अजून असे बरेच काही लिहूयात.


साधारण १३ महिन्यांपूर्वी आपण असाच उपक्रम पाच-पाच-पाच (भाग १ आणि भाग २) या दिवसाच्या निमित्ताने केला होता.

चला मग करूया सुरुवात?