जिवन मला मिळाले.. तुला पाहिले की
प्रेम काय ते कळाले.. तुला पाहिले की
नयनि सदैव माझ्या अश्रु वाहात होते
अश्रु हि ते पळाले.. तुला पाहिले की
जिवनात कधी मी सौन्दर्य पाहिले नव्हते
सौन्दर्य मला कळाले..तुला पाहिले की
कोणासाठी जगु मी मला कळत नव्हते
जगन्याचे कारण मला मिळाले..तुला पाहिले की