फुटबॉल विश्वचषक ०६ - भाग २

                    पहिल्या फेरीतले हे सामने बधायचे सोडू नका..


१) १४ जून जर्मनी विरूध्द पोलंड

दोन शेजारच्या राष्ट्रांमधला हा सामना. शेजारचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे नेहमीच या सामन्याबद्दल एक प्रकारचे चुरसयुक्त वलय असते. भारत पाकिस्तान क्रिकेट  म्हणा हवं तर. शिवाय, जर्मनीचे दोन मुख्य खेळाडू क्लोज आणि पडोल्सकी हे जन्माने पोलंड मधले आहेत. आता बोला !  ग्रुप ए मध्ये पोलंड जर्मनी नंतरचे स्थान पटकावणार हा सर्वसाधारण कयास असला तरी पोलंडचा खेळ कमी लेखून चालणार नाही. एके काळी विश्वचषकात दोनदा तिसरे स्थान मिळवणारा हा पोलंड. उद्या जर्मनी विरूध्द स्थान राखण्यासाठी पोलंड अटीतटीचा लढा देईल. वर्स्ट केस मध्ये सामना  ड्रॉ करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असे त्यांच्या कोच ने आधीच जाहीर केले आहे. जर्मनी त्यांना अजिंक्य आहे याची जाणीव आहे. पण खेळात काहीही होऊ शकते. पोलंड जिंकल्यास त्यांचा आनंद मात्र अवर्णनीय असेल...

२) २० जून स्वीडन विरूध्द इंग्लंड

जर्मनी आणि पोलंडचे तसेच काहीसे स्वीडन आणि इंग्लंडचे. फुटबॉल या खेळाचाच यजमान असलेला  इंग्लडचा संघ, अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकणारा.  आत्तापर्यंत ११ वेळा इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सध्याचा त्यांचा कोच इरिक्सन हा मूळचा स्वीडीश आहे!. आत्ताच्या स्वीडन संघाबद्दल बोलायचे झाल्यास, क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये स्वीडनने युरोपीय देशांमधील सामन्यांत १० पैकी ८ सामने जिंकले होते आणि बेस्ट रनर अप मध्ये दुसरे स्थान पटकावले होते.


३) २१ जून हॉलंड विरूध्द अर्जेंटिना
जगातल्या दोन सर्वोत्कृष्ट संघांमध्ये गणल्या जाणाऱ्यांमधील सामना. हॉलंड आणि अर्जेंटिना दोघेही दोनदा 'वर्ल्ड चँपिअन्स' होते. दोघेही सेमी फायनल मध्ये जाणारच जाणार. अर्जेंटिना कडे तरूण खेळाडू मेस्सी आणि क्रीस्पो हे कोणत्याही संघाला नमवू शकतात अशी तज्ञांची खात्री आहे. नक्कीच, २१ जून ला एक खिळवून ठेवणारा सामना बघायला मिळणार यात शंका नाही. 


   विश्वविजेत्या ब्राझीलचा या स्पर्धेतला पहिला सामना क्रोएशिआ विरूध्द आत्ता थोड्याच वेळात चालू होणार आहे. ब्राझील चे कौशल्य पहायला मिळणार, क्रोएशिआला हा संघ कसा गुंडाळतो याची उत्सुकता स्वस्थ बसू देत नाहीये... तेव्हा, या सामन्याबद्दल आणि कालपरवा झालेल्या सामन्याबद्दलची अद्ययावत माहीती घेऊन पुढच्या भागात हजर होईन..
तोपर्यंत,
कीक पास अँड अ गोल !! हिप हिप हुर्रे !!


--मेघदूत
(मनोगत बातमीदार क्रीडा विभाग :)