इश्क...(३)

कवी शोधी प्रेम नभामध्ये
अन् प्रेयसीला चंद्रमधुनी ।
भले भले प्रेम शोधती,
अपयशी पणसारे अजुनही ॥


मजला जर का कोणी पुसले,
सांगेन मी त्या प्रत्येकाला ।
शोध तुझा तू थांबव मग बघ,
सापडशील तू इश्काला..


---------


जन्मापासुन जेव्हा-जेव्हा
इश्कापासुन मी लपलो ।
मिळता अवघी नजर तिची मी,
नखशिखांन्त प्रेमी भिजलो ॥


विश्वामध्ये ना आला कोणी,
ह्रदयावाचुन जन्माला ।
वाचक हो मग सांगा कैसे,
टाळावे या इश्काला ॥


----------


रंगांचा मज अर्थ उमगला,
कळली भाषा नयनांची ।
स्पर्ष म्हणजे काया समजले,
जुळता गाणी ह्रदयांची ॥


परमानंदी बनलो मी
जणु स्पर्षुन आलो मोक्षाला ।
पडुनही मी प्रेमी जेव्हा
उचलुन धरले इश्काला ॥


----------


स्पर्षिले ना फुल ज्यांनी
घेऊन काट्यांची भीती ।
विरहाच्या चिंतेत दूषली
ज्यांनी इअश्काची महती ॥


अशांसाठी ही नम्र विनंती
स्पर्षु नका या काव्याला ।
ह्यारचना प्रेमींसाठी अन्
अर्पण त्यांच्या इश्काला ॥


---------


श्वासामध्ये 'इश्क' माझिया
उच्छ्वासातुन 'प्रेम' असे,
हर मादक तरुणीमध्ये
हाय मला प्रियसी दिसे ।


भ्रमरापरी मी आहे प्रेमी
मानतो सुगंधी जगण्याला,
कित्येक रंगांनी आहे मी
सुगंधले या इश्काला ॥


----------


प्रेमामध्ये वाचक हो ती
नसताना ही मज दिसते,
गोड गाणी प्रेमाची ती
नसुनही कानी गुणगुणते ।।


एकांतातही जेंव्हा जेंव्हा
स्पर्षुन जाते ती मजला ।
सांगुन जाते प्रियसी माझी
जमते जादू इश्काला ॥


----------