तुझ माझं नात आलं भरुन आभाळ
आसु झेलाया डोळ्यात
रान रंगाच भुलाळ...
तुझं माझं नात झालं मोकळं आभाळ
दंवावर पांघरली
ऊन्हं कोवळी सकाळ....
तुझं माझं नात नाहि हिशेब कशाचा
सडा टाकितो प्राजक्त
ओला सुगंध मातीचा....
तुझं माझं नात जीवाभावाचं फ़ुलण
स्वच्छंद पाखराचे
पुन्हा घरट्यात येणं....